मागील वर्षी झालेल्या कमी पर्जन्यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळ आहे. दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आहे. यावर्षी देशात समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खाजगी संस्थेने वर्तवली आहे. यामुळे याधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजांनुसार, देशात एकूण ९६ ते १०० % पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९६ ते १०४ % पाऊस हा सरासरी एवढा समजला जातो. यावर्षी समाधानकारक पावसाबरोबरच दुष्काळ किंवा अतिवृष्टीची शक्यता नसल्याचे स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे.
यानंतर, एप्रिल महिन्यात स्कायमेट आपला सुधारित अंदाज वर्तवणार आहे. या अंदाजामधून देशातील पर्जन्यमानाविषयीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. तरीही स्कायनेटने वर्तवलेले हा अंदाज दुष्काळाच्या संकटात असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठीं दिलासादायक आहे.